आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यावर एकही रुपयांचे कर्ज नसल्याचा तलाठ्याचा अहवाल

अहमदनगर / नगर सह्याद्री

नगर तालुक्यातील खांडके येथील शेतकरी संपत लक्ष्मण गाडे यांनी आज राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. प्रशासनावर आरोप करीत कौडगाव जवळ नगर पाथर्डी रस्त्यावर शेतकर्‍यांनी रास्ता रोको केला.

तातडीने तलाठी शेलार यांनी सर्व बँका व सोसायटीची तपासणी केली असता गाडे व त्यांच्या वडीलांच्या नावे एकही रुपयांचे कर्ज नसल्याचे सिद्ध झाले आहे. तसा अहवाल तलाठी शेलार यांनी तहसीलदार यांच्याकडे पाठवीला आहे.

त्यामुळे नेमके गाडे यांनी आत्महत्या कशामुळे केली याबाबत आणखी संभ्रम वाढला आहे. प्रशासनावर होत असलेल्या आरोपामुळे दुसरे असणारे कारण लपवून राहू नये यासाठी पोलीस प्रशासनाने कसून चौकशी करण्याची गरज आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!