विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठी झेप घेईल – पिंकी शेख

अहमदनगर । नगर सह्याद्री

वंचित बहुजन आघाडीने लोकसभा निवडणुकीत आपले स्थान प्रत्येक पक्षांना दाखवून दिले आहे. आघाडीची ताकद राज्यात वाढत आहे. अनेक ठिकाणी आघाडीच्या उमेदवारांनी द्वितीय क्रमांकाची मते मिळविली. जनतेच्या पाठबळावर ही वाटचाल अशीच सुरू राहील. येत्या विधानसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी मोठी झेप घेईल, असा विश्‍वास वंचित बहुजन आघाडीच्या राज्य प्रवक्त्या दिशा पिंकी शेख यांनी व्यक्त केला.

शेख यांच्या हस्ते नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष सागर भिंगारदिवे, युवा जिल्हा महासचिव विनोद गायकवाड व नगर जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब गायकवाड यांचा निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी जिल्हाध्यक्ष अशोक सोनवणे, शहर जिल्हा महासचिव सुनील शिंदे, दिलीप साळवे, युवा शहराध्यक्ष हनीफ शेख, अक्षय भिंगारदिवे, नितीन घोडके, प्रतीक बारसे, किरण जाधव, वैभव साळवे, स्वप्नील कांबळे, सिद्धार्थ भिंगारदिवे, सलान बेग, दया गजभिये, योगेश थोरात आदी उपस्थित होते.

जिल्हाध्यक्ष सोनवणे म्हणाले, येत्या विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील सर्वच्या सर्व जागा वंचित बहुजन आघाडी व मित्रपक्ष लढविणार आहे. आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांचे हात बळकट करू. कर्तृत्वसंपन्न व सामाजिक प्रतिष्ठान असणार्‍या उमेदवारांना उमेदवारी दिली जाईल. त्यांना निवडून आणण्यासाठी आम्ही सर्वजण पूर्ण ताकदीनिशी प्रचार करू असेही ते म्हणाले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!