‘पृथ्वी अग्रो’ चे जिल्हाभरात नेटवर्क

अहमदनगर – नगर सह्याद्री – नगर कृषी उत्पन्न मार्केट कमिटीच्या आवारातील पृथ्वी अॅग्रो सव्र्हिसेसच्या गोदामावर भरारी पथकाने टाकलेल्या छाप्यात मुदतवाह कीटकनाशके आढळून आल्याने शेतक-यांची होणारी लूट उघडकीस आली आहे. पृथ्वी अॅग्रोचा मालक जिल्हाभरातील अनेक छोट्या दुकानदारांना कीटकनाशके, खते व इतर शेतीशी संबंधित औषधांचा पुरवठा करतो. त्यामुळे त्याच्या फसवणुकीचे रॅकेट जिल्हाभरात सक्रिय असण्याची शक्यता आहे. कृषी विभागाने आतापर्यंत जिल्ह्यातील तब्बल १२६ कृषी सेवा केंद्राची तपासणी केली आहे. या तपासणीचा अहवाल अजून जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयास प्राप्त झालेला नाही. सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात  येईल, असे प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विलास नलगे यांनी सांगितले.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!