गुंतवणूकदारांनो; जादा परताव्याच्या अमिषाला बळी पडू नका!

पारनेर – नगर सह्याद्री – नाशिक येथील संकल्प सिद्धी व साई मल्टिस्टेट ऑपरेटिव्ह लिमिटेड या दोन्ही संस्थांमध्ये महाराष्ट्र कर्नाटक राज्यातील शेकडो गुंतवणूकदारांचे कोट्यावधी रुपये गुंतले आहेत. सध्यातरी या ठेवी मिळण्याबाबत गोंधळाचे वातावरण आहे. त्यामुळे या दोन्ही कंपन्यांमध्ये ज्यादा परताव्याच्या आमिषाला बळी पडून अनेकांनी गुंतवणूक केली आहे. त्यामुळे भविष्यात ज्यादा परताव्याच्या आमिषाला बळी न पडता राष्ट्रीयकृत अथवा सहकार खात्याच्या अखत्यारित असणाऱ्या या वित्तीय संस्थामध्येच गुंतवणूक करा असे आवाहन करण्यात येत आहे. या विषयाच्या अनुषंगाने गेली सात – आठ दिवस नगर सह्याद्रीच्यावतीने सामाजिक बांधिलकी जपत गुंतवणूकदारांची भूमिका मांडली.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!