भ्रष्टाचार प्रकरणी मजले चिचोंलीचे ग्रामपंचायत सदस्य अपात्र

महिला सरपंचाच्या बोगस सह्या आल्या अंगलट

अहमदनगर । नगर सह्याद्री

नगर तालुक्यातील मजले चिंचोली येथील ग्रामपंचायत सदस्य धर्मनाथ आव्हाड यांना नाशिक विभागीय आयुक्त यांनी ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार केल्याप्रकरणी दोषी ठरवून ग्रामपंचायत सदस्य पदावरून अपात्र ठरविले आहे.

मजले चिंचोलीच्या तत्कालीन सरपंच गितांजली आव्हाड यांना अंधारात ठेवून तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड यांनी ग्रामसेवक श्रीकांत जर्‍हाड यांना हाताशी धरून जलयुक्त शिवार योजनेच्या नावाने महाराष्ट्र व सहकारी बँकेमध्ये सरपंचांना कल्पना न देता खाते उघडून बेकायदेशीर व्यवहार केल्याची तक्रार विभागीय आयुक्तांकडे केली होती.

तसेच ग्रामपंचायत हद्दीमध्ये असलेल्या राजीव गांधी पतसंस्थेध्ये सरपंचांना कल्पना न देता तत्कालीन उपसरपंच धर्मनाथ आव्हाड व तत्कालीन ग्रामसेवक श्रीकांत जर्‍हाड यांनी संयुक्त सहिने परस्पर कागदपत्रे बनवून पाणीपट्टीचे अनधिकृत खाते उघडले होते. विभागीय आयुक्त राजाराम माने यांनी सर्व प्रकरण लक्षात घेता धर्मनाथ आव्हाड यांचे सदस्य पद रद्द करण्याचा आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिला आहे.

यामुळे धर्मनाथ आव्हाड यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व अडचणीत आले आहे. नुकत्याच झालेल्या सरपंच पदाच्या निवडणुकीत त्यांच्या गटाने बाजी मारली आहे. मात्र मागील काळातील प्रकरणाने ते अडचणीत आले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!