मुख्यमंत्र्याची रविवारची महाजनादेश यात्रा रद्द

अहमदनगर । नगर सह्याद्री

येत्या विधानसभा निवडणुकीत दुसर्‍यांदा भगवा फडकवण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची महाजनादेश यात्रा रविवारी जिल्ह्यात येणार होती. मात्र शनिवारी दुपारी माजी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांचे निधन झाल्याने रविवारची महाजनादेश यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती भाजपा कार्यालयातील सूत्रांनी दिली.

महाजनादेश यात्रा रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील अकोले, संगमनेर, राहुरी, नगर येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा होणार नाहीत. जिल्ह्यात महाजनादेश यात्रेची जय्यत तयारी करण्यात आली होती. यात्रेच्या स्वागतासाठी यात्रेच्या मार्गावर ठिकठिकाणी स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.

मात्र, महाजनादेश यात्रा रविवारी थांबविण्यात आल्याने सर्व तयारीवर पाणी फेरले आहे. आता मुख्यमंत्र्यांची महाजनादेश यात्रा जिल्ह्यात कधी येणार याची उत्सुकता लागून राहिली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!