आदिवासी समाजाला मूलभूत सुविधा पुरविणा – काशिनाथ दाते

पारनेर । नगर सह्याद्री

आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आदिवासी समाजाला मूलभूत सोयीसुविधा जि.प.च्या माध्यमातून पुरविणार असल्याचे मत जि.प.सदस्य काशिनाथ दाते यांनी व्यक्त केलेे.

जिल्हा परिषद अहमदनगर ग्रामीण पाणी पुरवठा विभाग राष्ट्रीय पेयजल योजना अंतर्गत खडकवाडी, जांभळवाडी ता.पारनेर येथील 13 लाख रूपये खर्चाची योजना मंजूर करुन विहीर नळ पाणीपुरवठा करण्याचे भूपजन दाते यांनी केले यावेळी ते बोलत होते.

ते म्हणाले खडकवाडी, जांभळवाडी येथील शंभर टक्के अदिवासी ठाकर समाजाच्या असलेल्या वस्तीला पिण्याच्या पाण्याचा कायमस्वरुपी प्रश्न मार्गी सोडविला. त्यासाठी पाझर तलावाखाली नवीन विहीर घेऊन, संपूर्ण वस्तीला पाणीपुरवठा करण्याचे सांगितले. जिल्हा परिषद निवडणुकीत खडकवाडी गावाचा चेहरा बदलून ना. विजयऔटी यांच्या माध्यमातून या भागात विकासाचा डोंगर उभा करण्यात आल्याचे सांगितले.

यामध्ये गावातील पिण्याच्या पाण्याची टाकी, चर्मकार वस्ती वितरण व्यवस्था, कुरणवस्ती येथील बंधारा, सी.डी.वर्क, पानंदवस्ती रस्ता, स्मशानभूमी सुशोभिकरण तसेच जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभाग अंतर्गत वैयक्तिक लाभ योजने अंतर्गत मागील वर्षी 23 तर, या वर्षी 30 मागासवर्गीय विद्यार्थ्यांना सायकल वाटप करण्यात येईल. यापुढे लोकांनी विकासाबरोबर राहण्याचं आवाहन दाते यांनी केले.

यावेळी उपसरपंच माऊली गागरे, विठ्ठलराव रोकडे, कोंडीभाऊ गागर, अमोल रोकडे, काशिनाथ हुलावळे, बबन चौधरी, अर्जुन केदार, संतोष खणकर, काशिनाथ केदार, बुधा केदार, नारायण केदार, बाबु केदार, सोमनाथ जाधव, रविंद्र गागरेे, गणेश आनंदा चिकणे, रामदास चिकणे, धावजी चिकणे, लिंबा जाधव, नितीन केदार, तावजी जाधव, शंकर जाधव, सचिन केदार, संजय केदार, उपअभियंता टोपे साहेब, शाखा अभियंता पंडित आदींसह आदिवासी बांधव उपस्थित होते. प्रास्ताविक अमोल रोकडे यांनी केले तर आभार अर्जुन केदार यांनी मानले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!