पारनेर शहरातील पश्चिम सेवा सोसायटीत निकृष्ट दर्जाचा गहू वाटप

लाभार्थ्यांची पुरवठा शाखेकडे तक्रार

पारनेर । नगर सह्याद्री

पारनेर शहरातील नवीपेठ येथे असणारी पश्चिम विभाग सेवा सोसायटी मध्ये गोरगरिब जनतेला वाटप करण्यात आलेल्या गहु निकुष्ट दर्जाचा असल्याचा प्रकार घडत आहे अश माहिती पारनेर शहरातील सामाजिक कार्यकर्ते भाऊसाहेब खेडेकर यांनी पुरवठा आधिकारी जयश्री माळी व पारनेरचे तहसिलदार प्रविण चव्हाणके यांच्या निदर्शनास आणुन दिले आहे.

सविस्तर माहिती अशी कि पारनेर शहरातील गोरगरिब जनतेला रेशनचे गहु तांदुळ मीळण्याकरिता शहरातील नवीपेठ येथे पश्चिम विभाग सेवा सोसायटी आहे. या सोसायटीच्या लाभार्थीना गहु वाटप करण्यात येतो तो अत्यंत निकृष्ट दर्जाचा असल्याचा प्रकार घडत आहे. या सोसायटीचे कर्मचारी चांगला गहु बाजुला ठेवतात व खराब गहु लाभार्थीना वाटप करतात अशी तक्रार शहरातील महिलांनी केली आहे. महिलांनी या बाबत सोसायटी कर्मचारी यांना विचारणा केली तर शासन आम्हाला असाच गहु देत असल्याची उत्तर देतात.

त्यामुळे संबधित प्रशासनाने गोरगरिब जनतेला देत असलेला निकृष्ट दर्जाचा गहु चांगला प्रतिचा देण्याची मागणी होत आहे. यासबंधी निकृष्ठ प्रतीचे गहू सोशल मीडियावर झळकताच महसूल यंत्रणेने चांगल्या प्रतीचा गहू देण्यात येणार असल्याचे सांगितले. दरम्यान, चांगल्या प्रतिचा गहु देण्याच्या आदेश सेवा सोसायटीला देत असल्याचे जिल्हा पुरवठा आधिकारी जयश्री माळी यांनी सांगितले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!