फ्लेक्समुळे वीज खंडीत झाल्यास कारवाई

महावितरणचा इशारा । फ्लेक्स वीजतारांवर पडल्याने पसपरिंडळात 240 ठिकाणी वीज खंडित

अहमदनगर । नगर सह्याद्री

वादळी पावसाने नाशिक परिमंडळातील नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात फ्लेक्स आणि फ्लेक्स लावण्यासाठीचा आराखडा ( स्टक्चर ) पडून जवळपास 240 ठिकाणी वीज खंडित झाली. यापुढील काळात फ्लेक्स पडल्याने वीजपुरवठा खंडित झाल्यास संबंधितांवर कारवाई करून नुकसान भरपाई वसूल करण्याची कार्यवाही महावितरणकडून करण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्य अभियंता ब्रिजपालसिंह जनवीर यांनी दिली.

गेल्या आठ दिवसांपासून नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळी वार्‍यासह आलेल्या पावसाने वीज वितरण यंत्रणेची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. वीजतारांवर वृक्ष उन्मळून पडणे, झाडांच्या मोठ्या फांद्या पडणे याशिवाय फ्लेक्स आणि ते बसवण्यासाठीचे स्टक्चर वीजतारांवर पडून वीज पुरवठा बाधित होण्याच्या घटना यावर्षी प्रकर्षाने पुढे आल्या आहेत.

फ्लेक्सच्या कारणाने गेल्या पाच दिवसांत नाशिक परिमंडळात जवळपास 240 ठिकाणी वीज पुरवठा यंत्रणा बाधित झाली आहे. वीज वाहिन्यांवर फ्लेक्स किंवा त्यांचा आराखडा पडल्याने दोन उपकेंद्र बंद होण्याचे प्रकार घडले आहेत. दोन्ही खांबांमधील तारांवर अडकलेले फ्लेक्स काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते किंबहुना तशी यंत्रणा तातडीने उपलब्ध होत नसल्याने पुरवठा बाधित राहण्याचा कालावधी वाढतो.

त्यामुळे यापुढील काळात फ्लेक्स किंवा तो बसवण्यासाठीचा आराखडा पडून वीज खंडित झाल्यास संबंधित फ्लेक्स बसवणार्‍या एजन्सी मालकावर कारवाई करून झालेले नुकसान वसूल करण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!