नेवासा ते शेवगाव रोडवरील अवैधव्यवसाय बंद करा

छावा क्रांतिवीर सेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पोलिस अधीक्षकांची भेट

अहमदनगर । नगर सह्याद्री

नेवासा ते शेवगाव रोडवरील अवैधधंदे त्वरीत बंद होण्यासाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पोलीस अधिक्षक इशू सिंधू यांची भेट घेऊन निवेदन दिले.

यावेळी छावाचे जिल्हाध्यक्ष रावसाहेब काळे, नेवासा तालुक्याचे युवा अध्यक्ष कमलेश नवले, संघटक पप्पू बोधक, संपर्कप्रमुख आदेश खाटीक, ह.भ.प. राजेंद्र महाराज पाटोळे, ह.भ.प. यादव महाराज, म्हस्केसर, सलीम सय्यद, अ‍ॅड.महेश शिंदे, साईनाथ बोराटे आदि उपस्थित होते.

नेवासा तालुक्यातील नेवासा फाटा ते शेवगाव रोडवर दिवसेंदिवस अवैधधंद्यांचा सुळसुळाट वाढला आहे. या रोडवरील अनेक हॉटेल व ढाब्यावर रात्री उशीरा पर्यंन्त अवैध दारु विक्री केली जाते. यामुळे गुन्हेगारी प्रवृत्तीची प्रस्थ येथे वाढला आहे.

युवक व्यसन व गुन्हेगारी क्षेत्राकडे वळत असून, अनेक संसार उध्वस्त होत आहे. तसेच अपघाताचे प्रमाण देखील वाढले असल्याचे निवेदनात म्हंटले आहे. या भागातील अवैधधंदे बंद न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने देण्यात आला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!