बाबा बंगाली चौकातील समस्या सोडवा – महापौर

महापौर, उपमहापौर, आयुक्तांकडून पाहणी

अहमदनगर । नगर सह्याद्री

प्रभाग 11 मधील व्यापारी मोहल्ला व बाबा बंगाली चौकात ड्रेनेज लाईन तुंबून घाण पाणी रस्त्यावर येत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याबाबत परिसरातील नागरिकांसह नगरसेवकांनी नवीन ड्रेनेज लाईन टाकण्याची मागणी केली होती. त्यानुसार महापौर, उपमहापौर, आयुक्त यांनी प्रभागात येवून पाहणी केली. दरम्यान, प्रभागातील समस्या तातडीने सोडविण्याचे आदेश महापौर यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिल्या.

नगरसेवक परवीन कुरेशी, मुजाहिद कुरेशी, नगरसेवक अविनाश घुले, कुमार वाकळे यांच्यासह परिसरातील नागरिकांनी महापौरांना प्रभागातील समस्याबाबत निवेदन दिले होते. त्यासंदर्भात प्रभाग 11 मधील व्यापारी मोहल्ला व बाबा बंगाली परिसरातील ड्रेनेज लाईन व पिण्याच्या पाण्यासंदर्भात महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालणताई ढोणे, आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग यांनी प्रत्यक्ष पाहणी केली.

यावेळी सभापती सौ.लताताई शेळके, नगरसेवक अविनाश घुले, माजी नगरसेवक मुजाहिद कुरेशी, राजेश लयचेट्टी, किशोर कानडे, पुष्कर कुलकर्णी, निलेश जाधव व महानगरपालिकाचे अधिकारी कर्मचारी व परिसरातील नागरिक उपस्थित होते. यावेळी महापालिका पदाधिकार्‍यांनाही ड्रेनेजचे पाणी रस्त्यावर येत असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे महापौर वाकळे यांनी संबंधित अधिकार्‍यांना तातडीने प्रभागातील पाण्याची व ड्रेनेज लाईनच्या समस्या सोडवाव्यात असे आदेश दिले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!