१४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार!

मुंबई – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असून मुहूर्त ठरला असल्याची सुत्रांची माहिती आहे. १४ जूनला राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याची अनेक दिवसांपासून चर्चा होती. अखेर त्यावर शिक्कामोर्तब झालं आहे. याआधी अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार असल्याचं सांगितलं होतं. येत्या विधानसभा अधिवेशनापूर्वीच मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं मुनगंटीवार म्हणाले होते.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!