११ पोलीस ठाणी, दोन शाखांचे ‘इन्चार्ज’ बदलले

अहमदनगर –  नगर सह्याद्री

जिल्हयातील ११ पोलीस ठाणे त दोन शाखांचे इन्चार्ज बदलण्यात आले आहेत पोलीस अधीक्षक इशू सिंधू यांनी काल सायंकाळी जिल्हा पोलिस दलातील ८ पोलीस निरीक्षक , ११ सहायक पोलीस निरीक्षक , १४ पोलीस उपनिरीक्षक अशा ३३ पोलीस अधिकार्यांच्या बदल्या केल्या आहेत.

कर्जत , राहुरी येथील पोलिस निरीक्षकांच्या बदल्या त्यांच्या तक्रारींचे प्रमाण जास्त असल्याने करण्यात आल्या आहेत. कर्जत पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांच्याविरोधात नागरिकांनी आंदोलन केले होते.

तसेच राहुरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हनुमंत गाडे यांच्याबाबतही तक्रारी होत्या. त्यामुळे दोघांची उचलबांगडी करण्यात आली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!