हद्दपार आरोपींच्या मुसक्या आवळल्या

अहमदनगर । नगर सह्याद्री

जिल्हाभरात पोलिसांची कारवाई । गुन्हेगारांचे धाबे दणाणले

हद्दपारीच्या कारवाईचे उलंघन करणार्‍या अनेकांवर पोलिसांनी पुन्हा गुन्हे दाखल केले. नगर मतदारसंघात  मंगळवारी  मतदान पार पडले, तर शिर्डी मतदारसंघात 29 एप्रिलला मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या   पार्श्वभूमीवर हजारो व्यक्तींंविरोधात प्रतिबंधात्मक, तर काहींवर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे. प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आलेल्या व्यक्तींकडूनही पत्र घेण्यात आले आहे. मात्र, ज्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आलेली आहे, त्यापैकी अनेकांनी आदेशाचे उलंघन केले. त्यामुळे पोलिसांनी अशा हद्दपार व्यक्तींच्या पुन्हा मुसक्या आवळल्या. 

कारवाईचे उलंघन केल्या प्रकरणी त्यांच्यावर वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. नगर तालुका दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या हद्दपारीच्या आदेशाचे उलंघन केल्याप्रकरणी आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्या आरोपींना हद्दपारीच्या नोटिसा बजावण्यात आलेल्या होत्या. मात्र, त्यांनी दंडाधिकार्‍यांच्या आदेशाचे उलंघन केले. सर्वांच्या विरोधात वेगवेगळ्या पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. 

शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकचौरे यांनी कोणतीही परवानगी न घेता सभा घेतली. याप्रकरणी संजय पुंजीराम महाले यांच्या फिर्यादिवरून राजूर पोलिसांनी वाकचौरे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अन्य दोन ठिकाणी देखील आचारसंहिता भंगाचे गुन्हे दाखल करण्यात आले. पक्षाचे झेंडे लावल्याप्रकरणी संगनेर पोलिसांनी अज्ञात व्यक्तींविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. संगमनेर येथील जाणता राजा मैदानावर सदाशिव लोखंडे यांच्या सभेसाठी झेंडे व फलक लावल्याप्रकरणी विठ्ठल भाऊसाहब ढगे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!