सव्वा कोटींच्या नोटा जप्त

निघोज / शिरूर – नगर सह्याद्री –

कवठे येमाई ता. शिरूर येथे शिरूर पोलिसांनी मोठी कारवाई करून चलनातून बंद झालेल्या जुन्या एक हजार व पाचशेच्या सुमारे १ कोटी २६ हजार रूपयांच्या नोटा जप्त करून गुन्हा दाखल करण्यात आला.

याप्रकरणी शिरूर पोलिसांनी तीन जणांना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती शिरूर पोलिस स्टेशनचे निरीक्षक नारायण सारंगकर यांनी दिली.

याबाबत पोलिस सुरेश दत्तात्रय चौधरी यांनी शिरूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. पोलिस निरीक्षक नारायण सारंगकर यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!