सव्वादोन लाखांचा गुटखा जप्त

अहमदनगर – नगर सह्याद्री –

कर्जत तालुक्यातील माहिजळगाव येथे महेंद्र जाधव व झुंबर भिसे यांच्या पान सेंटरवर छापा टाकून पोलिसांनी सुमारे सव्वादोन लाख रुपयांचा गुटखा व इतर बंदी असलेले तंबाखूजन्य पदार्थ पकडले.

स्थानिक गुन्हे शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार यांना ही गोपनीय माहिती मिळाली होती.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!