सर्जेपुरात दोन नगरसेवक समर्थकांमध्ये राडा

अहमदनगर । नगर सहयाद्री
सर्जेपुरा चौकात किरकोळ कारणावरून दोन नगरसेवक समर्थकांमध्ये सायंकाळी सात वाजता तुफान दगडफेक झाली. दरम्यान पोलिसांनी या दगडफेकीची गंभीर दखल घेत सर्जेपुरा चौकात मोठा पोलीस बंदोबस्त वाढवला आहे. दगडफेकीत माजी नगरसेवक आरिफ शेख यांच्यासह दोन जण  जखमी झाले आहेत.
अतिरीक्त पोलीस अधीक्षक सागर पाटील, शहर पोलीस उपअधीक्षक संदीप मिटके, पोलीस सर्जेपुरात दोन गटात तुफान दगडफेक ; नगसेवकासह दोन जखमी एच. पी.मुलानी यांच्यासह शीघ्रकृती दलाची तुकडी सर्जेपुरा चौकात तैनात करण्यात आली आहे. पोलिसांनी परिसरात गस्त वाढवली असून दगडफेक करणाऱ्यांचा शोध सुरू केला आहे. परिसरात असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे चित्रीकरणही तपासले जात आहे.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!