सत्तेसाठी काँग्रेसचा नवा डाव

नवी दिल्ली –

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी काँग्रेसने आता नवा डाव टाकला आहे. ‘लोकसभा निकालानंतर त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्यास आम्ही पंतप्रधानपदही सोडायला तयार आहोत. आघाडी सरकारमध्ये आम्हाला पंतप्रधानपद नाही मिळालं तरी काहीच अडचण नाही,’ असं काँग्रेसचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांनी म्हटलं आहे.

जर काँग्रेसच्या बाजूने सर्व मित्र पक्ष उभे राहत असतील तर आम्ही देशाचं नेतृत्व करायला तयार आहोत, हे आम्ही आधीच स्पष्ट केलं आहे. रालोआ सरकारला सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं कायम लक्ष्य राहिलं आहे.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!