सत्काराला फाटा देत विद्यार्थ्यांला दिली साइकल भेट  

निघोज । नगर सह्याद्री
निघोज येथील मुंबई येथील व्यवसायिक सुरेश रामचंद्र ढवण, सामाजिक कार्यकर्ते व माजी ग्रामपंचायत सदस्य दिलीप रामचंद्र ढवण, रमेश रामचंद्र ढवण या परिवाराने गुलाबशेठ आबाजी शिकारे यांची मुलगी तसेच सुरेश ढवण यांची मानसकन्या असलेल्या पूजा हिच्या लग्नात शाळेत पाच किमी पायी जाणार्‍या कुणाल संतोष बोर्‍हाडे याला विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांच्या हस्ते सायकल भेट देण्यात आली. ढवणवाडी येथील जिल्हा परिषद शाळेला तीन हजार रुपयांची देणगी ना. विजय औटी यांच्या हस्ते स्कूल कमिटीचे अध्यक्ष रंगनाथ पाटील ढवण यांच्याकडे देण्यात आली.
सत्काराला फाटा देऊन सुरेश ढवण यांनी पाच किलोमीटर पायी चालत जाऊन शाळेत जाणार्‍या कुणाल संतोष बोर्‍हाडे याला आठ हजार रुपयांची सायकल तसेच शाळेच्या विकासासाठी तीन हजार रुपये भेट देऊन सामाजिक काम केले असल्याने उपस्थितांनी सुरेश ढवण व परिवाराचे कौतुक केले.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!