शिवसेनेला सोबत घ्या; राष्ट्रवादीचा टेकू फेकून द्या!

कृतज्ञता सोहळ्यात मानले शहरातील मतदारांचे आभार

अहमदनगर – नगर सह्याद्री –

निवडणुका संपल्या आहेत आणि जनतेने आपल्याला विकासाच्या मुद्यावर मतदान केले आहे. नगर शहराचा सर्वांगिण विकास करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून प्रयत्न केले जातील आणि त्यासाठी मी स्वतः लक्ष घालणार आहे.

मात्र, त्याआधी महापालिकेत चुकीच्या लोकांची (राष्ट्रवादी) मदत घेऊन त्यांच्या पाठींब्यावर असणारी सत्ता संपुष्टात आणा. शिवसेनेला सोबत घ्या. या विषयावर मी स्वतः मुख्यमंत्री व उद्धव ठाकरे यांच्याशी पुढील आठवड्यात बोलणार आहे.

भाजपा – सेना युतीच शहराचा विकास करू शकते आणि त्यासाठी राष्ट्रवादीचा महापालिकेतील टेकू फेकून द्या असे स्पष्ट आदेश खा. डॉ. सुजय विखे पाटील यांनी दिले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!