वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही

मुंबई / वृत्तसंस्था

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी यंदाच्या शैक्षणिक सत्रात मराठा आरक्षण लागू होणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने दिला आहे.

वैद्यकीयच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठीच्या प्रवेश प्रक्रियेत १६ टक्के मराठा आरक्षण लागू केल्याच्या विरोधात नागपूर खंडपीठात याचिका दाखल झाली होती. या प्रवेश प्रक्रियांसाठी १६ टक्के मराठा आरक्षण लागू केले जात आहे. या आरक्षणाचा सर्वाधिक फटका खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांना बसत असून त्यांच्यासाठी केवळ १८ टक्के जागा शिल्लक राहिल्याचा आरोप याचिकाकर्त्यांच्यावतीने करण्यात आला होता. वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे. पूर्वीपासून असलेली सामाजिक आरक्षणे आणि नव्याने भर पडलेले मराठा आरक्षण, आर्थिकदृष्टय़ा मागास विद्यार्थ्यांसाठीचे आरक्षण यामुळे प्रवेश प्रक्रियेत गोंधळ निर्माण झाला होता.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!