विद्यार्थ्यांवर अन्याय; सरकारने अध्यादेश काढावा 

mumbai –

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाअंतर्गत देण्यात आलेले प्रवेश सर्वोच्च न्यायालयाने रद्द केले. या विद्यार्थ्यांचे गेल्या ९ दिवसांपासून आझाद मैदानात आंदोलन सुरुच आहे.  बुधवारी आंदोलनस्थळी खासदार संभाजीराजे यांनी भेट देऊन विद्यार्थ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले, की या मुलांच्यावर अन्याय झालेला आहे, सरकारने त्यांची बाजू समजून घेऊन मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या अधिकारात लवकरात लवकर अध्यादेश काढावा व या विध्यार्थ्यांना न्याय द्यावा.

वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी राज्य सरकारने सोमवारी सात दिवसांची मुदतवाढ दिल्यानंतरही मराठा विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरुच ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. जोपर्यंत सरकार प्रवेशाबाबत अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत आझाद मैदान सोडणार नाही, असा निर्णय त्यांनी घेतला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!