वाळकी : आमदार दत्तक गावात होतोय दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा

सुनिल चोभे | नगर सह्याद्री

आमदार आदर्श ग्राम योजनेअंतर्गत दत्तक घेतलेल्या गावचा सर्वांगीण विकास करण्यास आमदार राहुल जगताप सपशेल नापास झाले आहेत. आमदारांनी दत्तक घेतलेल्या वाळकी गावाला चक्क दहा दिवसांतून एकदा पाणी पुरवठा होत असल्याचे भीषण वास्तव समोर आले आहे . वाड्या वस्त्यांना तर पाणी मिळणेच मुश्किल झाले आहे. गावचा सामाजिक आर्थिक , शैक्षणिक स्तर उंचावणे , आरोग्य स्तर उंचावणे , कुपोषण , गुन्हेगारी आणि बेकारी कमी करणे , ग्रामविकासात लोकसहभाग वाढवणे , उत्तम दर्जाचे रस्ते उभारणे , वीज , सार्वजनिक सेवा – सुविधा पुरविण्याच्या मुख्य उद्देशाने आमदार आदर्श ग्राम योजना तयार करण्यात आली. केंद्राच्या धर्तीवर राज्यातील आमदारांनी आदर्श ग्राम योजना राबविण्याचा फतवा काढला . आमदारांनी गावांच्या निवडीही केल्या .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!