राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार  

शिर्डी / नगर सह्याद्री – भाजप प्रवेश हा मुद्दा राहिलेला नाही. लोकसभा निवडणुकीत मी जाहीरपणे युतीचा प्रचार केला आहे, असं स्पष्ट मत काँग्रेस चे माजी विरोधी पक्ष नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. संगमनेरमध्ये राधाकृष्ण विखेंनी प्रसारमाध्यमांशी बोलताना भाजप प्रवेश औपचारिकता राहिली असल्याचं स्पष्ट केलं.

तसेच मंत्रिमंडळ विस्ताराचा दिवस कधी आणि मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा याचा निर्णय मुख्यमंत्री घेतील. ज्या दिवशी मुख्यमंत्री सांगतील त्या दिवशी मी तयार असल्याचंही राधाकृष्ण विखे पाटलांनी स्पष्ट केले आहे.
मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पाहणारे अनेक नेते काँग्रेसमध्ये आहेत. या नेत्यांनी आता स्वतःहून बाजूला होऊन नव्यांना संधी देण्याची आवश्यकता असल्याची टीका अशोक चव्हाण आणि बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता त्यांनी केली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!