राधाकृष्ण विखे-पाटलांचा आमदारकीचा राजीनामा

मुंबई – काँग्रेसचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्षांकडे सोपविला आहे.

राधाकृकष्ण विखे पाटील म्हणाले की, माझी काँग्रेसमध्ये कोंडी होत आहे असुन आता माझी इथे घुसमट होत आहे. मला अनेक आमदार भेटत आहेत परंतु, त्यांनी राजीनामा द्यायचा की नाही हा त्यांचा निर्णय आहे. मी मात्र आज एकटा राजीनामा देत आहे.

या अगोदर राधाकृष्ण पाटील यांच्या बंगल्यावर एक बैठक पार पडली, या बैठकीस आमदार अब्दुल सत्तार, आमदार भारत भालके, जयकुमार गोरे, माढाचे खासदार रणजीत निंबाळकर आदींची उपस्थिती होती.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!