राधाकृष्ण विखेंसह काँग्रेसच्या आमदारांचा शुक्रवारी भाजप प्रवेश

मुंबई –

मंत्रिमंडळ विस्तारासाठी अखेर 14 जूनचा मुहूर्त ठरला असल्याची माहिती मंत्रालयातील सूत्रांनी दिली. राधाकृष्ण विखे-पाटील, रणजितसिंह मोहिते-पाटील यांच्यासह भाजपच्या सहा आणि शिवसेनेच्या एकाचा मंत्रिमंडळात समावेश होण्याची शक्यता आहे. दरम्यान, विखे यांच्यासह काँग्रेसचे काही आमदार गुरुवारी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचे वृत्त आहे.

मंगळवारी दिवसभर विस्ताराच्या हालचालींनी वेग घेतला. भाजपमधील अनेक इच्छुक आमदारांसह बाहेरून भाजपमध्ये आलेल्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतली. विखे यांच्या भाजप प्रवेशाबद्दल चर्चा सुरू झाली. आता त्यांचा पक्षप्रवेश होणार असून, लगेचच मंत्रिमंडळात समावेश होणार आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!