मॉन्सून अंदमानमध्ये आला रे!

 

मुंबई –

नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) आज (दि.१८) दक्षिण अंदमानात दाखल झाले. दक्षिण अंदमान समुद्र, दक्षिण बंगाल उपसागराचा काही भाग आणि निकोबार बेट भाग मॉन्सूनने व्यापला आहे, अशी माहिती भारतीय हवामान विभागाने दिली आहे.

बंगालचा उपसागर, उत्तर अंदमान समुद्र आणि अंदमान बेटाच्या उर्वरित भागात मॉन्सून व्यापण्यासाठी पुढील ३-४ दिवसांत पोषक वातावरण आहे, असेही हवामान विभागाने म्हटले आहे. येत्या ४८ तासांत निकोबार बेट भागात सगळीकडे हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडेल. २० ते २२ मे दरम्यान या भागात पाऊस कायम राहील, असेही हवामान विभागाने म्हटले आहे.  

अंदमान आणि निकोबारमध्ये मॉन्सूनचे आगमन २२ मे रोजी अपेक्षित आहे, असा अंदाज ‘स्कायमेट’ या खासगी हवामानविषयक अंदाज देणार्‍या संस्थेने बांधला होता. मात्र त्यापूर्वीच मॉन्सून अंदमानात दाखल झाला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!