मुंबई – अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी हवेच्या दाबामुळे ‘वायू’ चक्रीवादळाचा धोका पश्चिम किनाऱ्यावरील शहरांना बसणार आहे. हे चक्रीवादळ महाराष्ट्रापासून जलदगतीने गुजरातच्या दिशेने पुढे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने मुंबईसह महाराष्ट्रातील कोकण, पालघर, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग येथील समुद्रकिनारयांवर नागरिकांना जाण्यास बंदी घातली आहे.

 

भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार १२ आणि १३ जूनला गुजरातच्या पोरबंदर आणि कच्छ या परिसरात वायू वादळाचा फटका बसण्याची शक्यता आहे. मुंबईत बुधवारी सकाळपासून जोरदार वारे वाहत असून काही ठिकाणी पावसाचा शिडकावही पहायला मिळत आहे.

मुंबईत पडलेल्या पहिल्याच पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. अचानक आलेला पाऊस आणि गुडघाबर साचलेले पाणी यामुळे मुंबईकरांना कसरत करत जावे लागले. विजांच्या कडकडासह मुंबईत पाऊस बरसला.