माळीवाड्यात बत्ती गुल

वीज पडून जम्पिंग तुटल्याने मोठा बिघाड

अहमदनगर – नगर सह्याद्री –

नगर शहरातील दिल्लीगेट, पाइपलाइन, सावेडी, नालेगाव या भागांत सलग तिस-या दिवशीही विजेचा खेळखंडोबा सुरू होता.

गुरुवारी ६ तास, तर माळीवाडा परिसरात गुरुवारी सायंकाळपासून खंडित झालेला वीज पुरवठा शुक्रवारीही पूर्ववत झाला नव्हता.

जम्पिंग तुटल्याने वीजपुरवठा खंडीत होत होता. माळीवाडा परिसरात मुख्य बीज वाहिनीवरील जम्पिंग (इन्शुलेटर) तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला.

या परिसरात जम्पिंग टप्प्याटप्प्याने तडकून तुटल्याने वीजा पुरवठा खंडित झाला, असे महावितरणचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता धर्माधिकारी यांनी नगर सह्याद्रीशी बोलताना सांगितले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!