महावितरणच्या हलगर्जीपणामुळे पुजा कु-हेचा मृत्यू – राष्ट्रवादी

अहमदनगर – नगर सह्याद्री – नगर शहरातील वीज पुरवठा चोवीस तासात सुरळित करण्यात यावा अन्यथा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा निवेदनाद्वारे राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने महावितरणला देण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यस अभिजित खोसे, प्रवक्ते अरविंद शिंदे, सीताराम काकडे, समीर खान आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

दरम्यान, महावितरणच्या गलथान कारभारामुळे नागरिकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

आहे महावितरणच्या हलगर्जीपणा मुळेच पोलीस मुख्यालयात मुलीचा मृत्यू झाला आहे. वेळोवेळी तक्रार देऊनही काहीच दाखल घेतली गेली नाही अन्यथा त्या तरुण मुलीचा जीव वाचला असता, रात्रीच्या वेळी वीजपुरवठा खंडित झाल्याने नगर मध्ये अंधारामय साम्राज्य पसरले आहे.

रस्त्यात मोठे खड्डे असल्याने अंधारात प्रवास करताना त्रास होतो आहे. येत्या २४ तासात वीज पुरवठा सुरळीत झाला नाही तर सोमवारी आ. जगताप यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी महावितरणावर आंदोलन करणार असल्याचा इशारा दिला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!