महावितरणच्या निष्काळजीपणामुळे युवतीचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

पोलिस मुख्यालयातील घटना; पोलिस कुटुंबियांकडून महावितरणविरोधात संताप

अहमदनगर | नगर सह्याद्री –

विजेचा धक्का बसून पोलिस मुख्यालयात युवतीचा मृत्यू झाला. दोन दिवसांपासून परिसरात विजेचा प्रवाह येत असल्याचे महावितरणला सांगूनही त्यांच्याकडून दुर्लक्ष होते.

त्यामुळेच आज सकाळी ही दुर्दैवी घटना घडली. पूजा सुनील कुर्हे ( वय २१, रा. पोलीस मुख्यालय वसाहत, नगर) हे मयत युवतीचे नाव आहे.

तिचे वडील सहाय्यक फौजदार सुनील कुर्हे हे पोलीस मुख्यालयात नेमणुकीस होते. पूजा ही एमबीए चे शिक्षण घेत होती.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!