महारुफकडून कोतवालींतील कर्मचा-याने खाल्ला ‘मावा’!

अहमदनगर | नगर सह्याद्री-
सुगंधी तंबाखू व सुपारीपासून मशीनवर मावा तयार करणा-या महारूफ शेख याच्या घरी छापा टाकून एलसीबीने ३ लाख ५७ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. परंतु, या कारवाईतून नवीन धक्कादायक बाब उघडकीस आली आहे.

कारवाई वेळी शेख याने कोतवाली पोलिस ठाण्यातील एका कर्मचाऱ्याला हप्ता देत असल्याचे सांगितल्याचे खात्रीलायक सूत्रांकडून समजते.

शेख याच्याकडून ‘मावा’ खाणा-या त्या कर्मचाऱ्यावर पोलीस अधिक्षक साहेब नेमकी काय कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!