महापालिकेत युती हालचाली गतीमान शिवसेना उपनेते राठोड यांनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट

अहमदनगर नगर सह्याद्री :  लोकसभा निवडणूक निकालानंतर महापालिकेत शिवसेना-भाजपाची युती होणार असल्याच्या चर्चेने जोर धरला असून त्या अनुषंगानेच शिवसेनेचे उपनेते अनिल राठोड व पदाधिकारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली आहे . दरम्यान, शहर विकासासाठी निधी , केडगावला स्वतंत्र पोलिस स्टेशन यांसह विविध प्रश्नांसंदर्भात मुख्यमंत्र्यांशी सविस्तर चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे . जून मध्ये महापालिकेसंदर्भात पुन्हा बैठक होणार असल्याचे सांगण्यात आले .

लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजपा – शिवसेनेची युती झाली . तसेच काँग्रेस – राष्ट्रवादीची आघाडी झाली महापालिका निवडणुकीनंतर मनपात सत्ता स्थापनेच्यावेळी राष्ट्रवादीने शिवसे नेला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी आणि शहराच्या विकासासाठी भाजपाला पाठिंबा दिला . त्यामुळे १४ नगरसेवकांच्या बळावर महापालिकेच्या महापौर आणि उपमहापौरपदी भाजपाचे बाबासाहेब वाकळे व मालणताई ढोणे यांना संधी मिळाली .

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!