मनसेचं इंजिन विधानसभेत धडकणार ; ज्योतिष संमेलनातील भाकीत

मुंबई –

लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसला अप्रत्यक्षपणे फायदा होईल अशी भुमिका घेतली होती. त्याचा किती फायदा होईल हे २३ मे रोजी स्पष्ट होईलच. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसच्या साथीने मनसे आगामी विधानसभा निवडणुकीत पुन्हा भरारी घेईल आणि पुन्हा दोन आकडी जागा जिंकेल असे भाकीत नाशिकच्या ज्योतिष संमेलनात व्यक्त करण्यात आले आहे.

नाशिकमध्ये सुरु असलेल्या ज्योतिष संमेलनात महाराष्ट्र ज्योतिष परिषदेचे अध्यक्ष सिद्धेश्वर मारटकर शात्री यांनी हे भाकित केले आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत हातमिळवणी करुन मनसे विधानसभा निवडणूक लढवेल असेही मारटकर यांनी म्हटले आहे. येत्या विधानसभेत जनता मनसेला भरभरुन मते देईल त्यामुळे मनसेचे पुन्हा दोन आकडी आमदार निवडून येतील असे त्यांनी म्हटले आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!