भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलची बारावी बोर्ड परिक्षेत यशाची परंपरा कायम


शास्त्र विभागाचा 98 टक्के तर वाणिज्य विभागाचा 97 टक्के निकाल
गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

अहमदनगर / नगर सह्याद्री – अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी मार्च 2019 मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता बारावी बोर्डाच्या परीक्षेत उज्वल यश प्राप्त करीत, आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. विद्यालयाचा शास्त्र विभागाचा निकाल 98.68 टक्के तर वाणिज्य विभागाचा निकाल 97.77 टक्के लागला आहे. शाळेतील दोन्ही शाखेत पहिल्या पाच क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांसह मार्गदर्शक शिक्षक व पालक उपस्थित होते.

विद्यालयाच्या गुणवत्ता यादीत शास्त्र विभागात पहिला- अविष्कार आंधळे (94.61 टक्के), दुसरा- अभिषेक धर्माधिकारी (93.53 टक्के), तीसरी- निकिता तिपुळे (92.61 टक्के), चौथी- आदिती निरफराके (88.46 टक्के), पाचवा- आदित्य शिंदे (87.69 टक्के), तसेच वाणिज्य विभागात पहिला- सार्थक बरमेचा (91.23 टक्के), दुसरा- मेहूल सोनीमंडलेचा (90.61 टक्के), तीसरी- सिध्दी पोखरणा (89.38 टक्के), चौथी- दिया नहार (89.23 टक्के), पाचवा-श्रेयस डागा (88.15 टक्के) यांनी घवघवीत यश संपादन केले. या यशाबद्दल गुणवंत विद्यार्थी व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या  शिक्षकांना संस्थेच्या प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त अ‍ॅड.गौरव मिरीकर, सुनंदाताई भालेराव, मुख्याध्यापक उल्हास दुगड, पर्यवेक्षक सुनिल खिस्ती, संजय पडोळे, रवींद्र लोंढे आदिंसह संस्थेच्या पदाधिकार्‍यांनी शुभेच्छा दिल्या.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!