भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलचे 10 वी बोर्डाच्या परीक्षेत नेत्रदीपक यश  


शाळेचा 99.73 टक्के निकाल तर 53 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण
99 टक्के गुण मिळवून पियुषा पाटील प्रथम 

अहमदनगर / नगर सह्याद्री

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात आलेल्या इयत्ता 10 वी एसएससी बोर्डाच्या परीक्षेत अ.ए.सो. च्या भाऊसाहेब फिरोदिया हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करीत शाळेची उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम राखली. विद्यालयाचा 10 वी बोर्डाचा निकाल 99.73 टक्के लागला असून, 53 विद्यार्थ्यांनी 90 टक्के पेक्षा अधिक गुण प्राप्त केले आहे. तसेच संस्कृत विषयात 20 तर गणित विषयात 4 विद्यार्थ्यांनी 100 पैकी 100 गुण मिळवले.

शाळेच्या गुणवत्ता यादित पियुषा पाटील ही 99 टक्के गुण घेऊन पहिली आली. शाळेची गुणवत्ता यादी पुढील प्रमाणे  पहिली- पियुषा पाटील (99 टक्के), दुसरी- ऋग्वेदा कुलकर्णी (98.40 टक्के), तीसरी- अदिती घोडके (98.20 टक्के), चौथा- आयुष मुनोत, प्रणव तांबे (98 टक्के), पाचवा- प्रसाद चौरे (97.40 टक्के), सहावा- अमित कुलकर्णी, साक्षी पादीर (97.20 टक्के), सातवी- ज्ञानश्री गोसकी (97 टक्के), आठवा- शौनक मुजुमदार (96.80 टक्के).

या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचे व त्यांना मार्गदर्शन करणार्‍या अध्यापकांचे संस्थेचे प्रमुख कार्यवाह छायाताई फिरोदिया, सहकार्यवाह गौरव फिरोदिया, संस्थेचे उपाध्यक्ष अशोक मुथा, खजिनदार प्रकाश गांधी, विश्‍वस्त अ‍ॅड.गौरव मिरीकर, सुनंदाताई भालेराव, विद्यालयाचे मुख्याध्यापक उल्हास दुगड, पर्यवेक्षक सुनील खिस्ती, संजय पडोळे, रवींद्र लोंढे यांनी अभिनंदन केले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!