बॉम्बस्फोटातील आरोपीला तिकीट हा लोकशाहीवरील हल्ला

मुंबई : बॉम्बस्फोटातील आरोपींना लोकसभेचे तिकीट देणे हा लोकशाहीवरील हल्ला आहे, अशी घणाघाती टीका राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर केली.

पवार यांचा रोख मालेगाव स्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यावर होता. मुस्लिम समाजात शुक्रवार हा पवित्र मानला जातो. यादिवशी मुस्लिम स्फोट घडवतील, असे मला वाटत नाही, असे पवार म्हणाले. या प्रकरणात मुस्लिम तरुणांना करण्यास मी आक्षेप घेतला होता. त्यानंतरच हेमंत करकरे यांनी प्रज्ञा सिंह ठाकूर यांना अटक केली, अशी माहिती पवार यांनी दिली. आणि आता त्याच संसदेत अभिभाषणावेळी राष्ट्रपतींच्या समोर असतील, अशी खंत त्यांनी व्यक्त केली.

मालेगाव स्फोटासंदर्भात खटल्याच्या सुनावणीसाठी साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर गेल्याच आठवड्यात एनआयए न्यायालयात हजेरी लावली होती. साध्वी प्रज्ञा सिंह ठाकूर या भाजपच्या तिकिटावर भोपाळ लोकसभा मतदारसंनघातून निवडून आल्या आहेत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!