बेन्जो पथकाचा टेम्पो उलटून एक ठार

नगर सह्याद्री –  जामखेड  तालुक्‍यातील जातेगाव रोडवर के.के बेन्जो या पथकाचा टेम्पो उलटून बॅण्ड मास्तर किशोर गुलाब गायकवाड (वय 45) रा. तेलंगशी ता. जामखेड या इसमाचा या गाडीखाली दबून मृत्यू झाला.

तर या अपघातात चार जण जखमी झाले आहेत. तेलंगशी येथून के.के. पथकाचे मालक किशोर जावळे हे आपल्या बॅण्ड पथकासह लग्नाची सुपारी वाजविण्यासाठी आपल्या पथकाला घेऊन खर्डा येथे लग्नासाठी निघाले होते.

याचवेळी गाडीवरील ताबा सुटल्याने बेन्जोची गाडी पल्टी होऊन गाडीला अपघात झाला. त्यामध्ये किशोर गुलाब गायकवाड (वय-45) यांचा या गाडीखाली दबून दुर्दैवी मृत्यु झाला.

तर त्यासोबत असणारा त्याचा भाऊ विनोद गुलाब गायकवाड गंभीर जखमी झाला आहे. इतर प्रवीण जायभाय, दादू गायकवाड, वंदना गायकवाड या किरकोळ जखमींना खाजगी रूग्णालयात दाखल करण्यात आले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!