बिबट्याने पाडला कालवडीचा फडशा

बेल्हे / नगर सह्याद्री
दबा धरलेल्या बिबट्याने गोठ्यात बांधलेल्या कालवडीचा जाग्यावरच फडशा पाडला. ही घटना राजुरी येथे घडली.
याबाबत समजलेली हकीकत अशी, राजुरी(ता.जुन्नर) येथे, लवण मळयात नारायण पोपट पिंगळे यांच्या राहत्या घरासमोर असलेल्या त्यांच्या गोठ्यात गायी सह कालवडी बांधतात. त्यांनी आपल्या कालवडीला दारासमोरील गोठ्यात बांधले होते. आज (मंगळवारी) पहाटे तीनच्या सुमारास गायीचा हंबरडयाचा आवाज आला. ते घराबाहेर आले, तेंव्हा बिबटयाने हल्ला करत त्यांच्या कालवडीचा फडशा पाडला. तिला फरफटत ओढत जवळच असलेल्या ओढ्यात घेऊन गेला. या घटनेची माहिती मिळताच वनरक्षक जे.बी.सानप यांनी घटनास्थळी धाव घेतली, घटनेचा पंचनामा केला, परिसरात बिबट्याच्या पंज्याचे माग आढळून आले आहेत.
दरम्यान गेल्या एक ते दिड महीण्यात परीसरात नऊ वासरे, वीस शेळयामेंढया बिबट्याच्या हल्ल्यात ठार झाले आहेत. परिसरात बिबट्याने मानवी हल्ला करण्यापूर्वी त्याचा बंदोबस्त करण्यासाठी वनविभागाने ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी पंचायत समीतीचे माजी सभापती दिपक औटी, सरपंच एकनाथ शिंदे, माजी सरपंच ज्ञानेश्वर शेळके यांनी केली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!