पतीच्या मृत्यूनंतर पत्नीनेही घेतला जगाचा निरोप!

अहमदनगर – नगर सह्याद्री –

पतीच्या मृत्यूनंतर अवघ्या तीन दिवसांत पत्नीनेही जगाचा निरोप घेतल्याची घटना नेप्ती (ता. नगर) येथे घडली.

नव्वदी गाठलेल्या या वृद्ध जोडप्याची एकापाठोपाठ प्राणज्योत मावळली पतीचा विरह सहन न झाल्याचा घमा बसूनच पत्नीने आपला देह ठेवला.

इंद्रायणी / त्रिंबक दगडू पाचारणे असे या वृद्ध दाम्पत्याचे नाव आहे. नेप्ती, ता. नगर येथील प्रगतशील शेतकरी त्रिंबक दगडू पाचारणे (वय ९०) यांचे गुरुवारी (दि . ०६ निधन झाले.

त्यानंतर अवघ्या तीनच दिवसांत म्हणजेच रविवारी (दि. ०९) त्रिंबक यांच्या पत्नी इंद्रायणी (वय ८६) यांनीही देह ठेवला.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!