नैसर्गिक व आरोग्याला लाभ होईल असे मार्गदर्शन मिळणे गरजेचे – विमल बाफना 

अहमदनगर । नगर सह्याद्री

 

आरोग्य आणि सौंदर्य हा महिलेचा स्थायीभाव आहे. त्यामुळे प्रत्येक महिला, युवती या आपल्या आरोग्य व सौंदर्याबाबत जागरुक असतात. परंतु मार्केटींगच्या जमान्यात बाजारात अनेक आरोग्य विषयक जाहिराती पहावयास मिळत आहेत. परंतु नैसर्गिक व आरोग्याला लाभ होईल असे मार्गदर्शन मिळणे जरुरीचे आहे.

 

नगरमधील आरोग्यवर्धिनी त्यादृष्टीने चांगले काम करत आहे. सध्याच्या धावपळीच्या जमान्यात प्रत्येकाचे आरोग्याकडे दुर्लक्ष होत आहे, अशा परिस्थितीत अ‍ॅक्युप्रेशन व मुद्रा क्रिया केल्याने त्याचा अनेकांना फायदा  झाला आहे. त्यामुळे महिला व युवतींनी आरोग्यवर्धिनीच्या वतीने आरोग्यदायी कोर्सेस व उपक्रम टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या संयुक्त विद्यमाने चालवले जातात याचा जरुर लाभ घ्यावा असे आवाहन ऑल इंडिया जैन कॉन्फ़रन्सच्या अध्यक्षा विमल बाफना यांनी केले.
You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!