निवडणूक आयोग पंतप्रधानांच्या दावणीला : मलिक

नवी दिल्ली

व्हीपॅटच्या ५० टक्के मतमोजणी करण्यासाठी विरोधकांनी दाखल केलेली पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली. यासोबतच लोकसभा निवडणुकीचा प्रचार करताना आचरसंहितेचे उल्‍लंघन केल्‍याच्या आरोपात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना निवडणूक आयोगाने आतापर्यंत तब्‍बल ९ वेळा क्‍लीन चिट दिली असल्याचे वृत्तदेखील समोर आल्याने  राष्ट्रवादीने  पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि निवडणूक आयोगाला चांगले धारेवर धरले आहे.

या पार्श्वभूमीवर  ट्‍विटरची मालिका करत राष्ट्रवादीने म्हटले आहे की, जनतेमध्ये लोकाशाहीवरचा विश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष करत आहे. पण निवडणूक आयोग हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दावणीला बांधलेला आहे अशी जोरदार टीका राष्ट्रवादीचे मुख्य प्रवक्ते नवाब मलिक यांनी केली आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!