नाशिकमध्ये दरोडा : मुथूट फायनान्स कार्यालयात गोळीबार, 1 ठार, 3 जखमी

नाशिक –

नाशिक मध्ये उंटवाडी परिसरातील सिटी सेंटर मॉलजवळील मुथूट फायनान्सच्या कार्यालयावर आज, शुक्रवारी (दि.१४) सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास धाडसी दरोडा पडला. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात एका कर्मचारी ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहे. भरदिवसा पडलेल्या दरोड्याने संपूर्ण शहर हादरून गेले आहे. दरम्यान, दरोड्याची माहिती मिळताच पोलिस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील, उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदींसह पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहे.

मुथूट फायनान्सचे कार्यालय उघडल्यानंतर चार दरोडेखोर आत घुसले. मॅनेजर आणि वॉचमनसह चौघांवर दरोडेखोरांनी गोळीबार करत लाखो रूपयांचा मुद्देमाल लुटून नेला. दरोडेखोरांच्या हल्ल्यात तीन गोळ्या लागल्याने एका कर्मचार्‍याला उपाचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालयात हलविण्यात आले. मात्र, उपाचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर इतर तीन जखमींवर खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!