नरेंद्र मोदींवर ७२ वर्षांसाठी बंदी घाला

नवी दिल्ली

पंतप्रधान नरेंद्र मोदींवर ७२ वर्षांसाठी बंदी घालण्यात यावी अशी मागणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी केली आहे. बंगालमध्ये नरेंद्र मोदींनी केलेलं भाषण अत्यंत लाजिरवाणं असल्याची टीका अखिलेश यादव यांनी केली आहे. नरेंद्र मोदींनी तृणमूल काँग्रेसचे ४० आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा केला असून यासंबंधी बोलत असताना अखिलेश यादव यांनी मोदींवर निशाणा साधला.

निवडणूक आयोगाने नुकतंच काही नेत्यांवर आचारसंहितेचं उल्लंघन केल्याप्रकरणी ७२ तासांसाठी बंदी घातली आहे. यामध्ये उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि पंजाबचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांचा समावेश आहे. निवडणूक आयोगाने दोघांनाही ७२ तासांसाठी प्रचारापासून दूर राहण्याचा आदेश दिला आहे.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!