नथुराम गोडसे हा देशभक्त होता – प्रज्ञा सिंह

भोपाळ – 

मध्य प्रदेशातील भोपाळ लोकसभा मतदारसंघातील भाजपच्‍या उमेदवार प्रज्ञा सिंह ठाकूर पुन्हा एकदा बरळल्या आहेत. नथुराम गोडसे हा देशभक्त होता आणि राहील, असे वादग्रस्त वक्तव्य त्यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे नवीन वादाला तोंड फुटले आहे.

अभिनेता कमल हसन यांनी नथुराम गोडसे याला हिंदू दहशतवादी म्हटले होते. याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना प्रज्ञा सिंह म्हणाल्या की, नथुराम गोडसे देशभक्त होता, आहे आणि राहील. त्याला हिंदू दहशतवादी म्हणणाऱ्यांनी स्वत:ला निरखून पहावे. अशा लोकांना या निवडणुकीत उत्तर मिळेल.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!