नगर शहर व उपनगरांत मुसळधार; रस्ते गेले पाण्यात

नगर सह्याद्री –

चार दिवसांपूर्वी शहरात वादळी पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सायंकाळी नगर शहर परिसरात मान्सूनपूर्व पाऊस जोरदार कोसळला.

दिवसभराच्या उकाड्या नंतर सायकाळी साडे पाचच्या सुमारास तासभर पाऊस झाल्याने शहरातील रस्त्यांवरून पाणी वाहिल्याने नगरकरांना चांगलेच धुऊन काढले.

शहरातील चितळे रस्ता ,लक्ष्मी कारंजा , गांधी मैदान, जिल्हा वाचनालया समोरील रस्ता ,नेता सुभाष चौक, तेलीखुंट,घुमरे गल्ली पटवर्धन चौल या भागात गुडघाभर पाणी साठले होते. आज झालेल्या तासभराच्या पावसाने कोणतेही नुकसान न होता फक्त रस्ते धुवून निघाले.

या भागातील पाणी सरे पर्यंत सुमारे तासभर वेळ लागला. तर उपनगरांमध्ये सावेडी परीसरात अनेक ठिकाणी रस्ते खोदून काम झाल्या नंतर त्यांची डागडुजी न केल्याने त्या खड्यात पाणी साठून डबकी तयार झाल्याचे पहायला मिळाले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!