नगरमध्ये चालती एसटी पेटली

अहमदनगर नगर सह्याद्री

याच आठवड्यात एसटी बस अपघातानंतर पेटून जळून खाक झाल्याची घटना ताजी असतांनाच आज ( शनिवारी ) पुन्हा शिल्पा गार्डनसमोर चालत्या बसने पेट घेतला. रिक्षा चालक, बस ड्रायव्हर व महापालिकेच्या अग्निशमनच्या पथकाने तातडीने हि आग विझविल्याने ७० ते ८0 प्रवासी बचावले.

राजगुरुनगरहून निघालेली पैठणला जाणारी एमएच १४ बीटी ४१५५ ही एसटी बस कायनेटीक चौक परिसरात साडेबाराच्या सुमारास पेटली . शेजारून जात असलेल्या रिक्षा चालकांच्या बस पेटल्याचे लक्षात आल्याने त्याने ते एसटी ड्रायव्हरच्या लक्षात आणून दिले . ड्रायव्हरने कशाचाही विलंब न लावता तातडीने बस शिल्पा गार्डनसमोर थांबवून बसमधील फायर सेप्फीयेशनने ती आग विझवण्याचा प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!