दोन दुचाकी चोरट्यांना अटक; तोफखाना पोलिसांची कारवाई

अनेक गुन्ह्यांच्या उलगडा

अहमदनगर – नगर सह्याद्री –

शहरात दुचाकींची चोरी करणा- या टोळीतील दोघांना अटक करण्यात आली आहे. तोफखाना पोलिसांनी ही कारवाई केली.

ज्ञानेश्वर देवीदास चव्हाण (वय – २२, रा. रांजणी, ता. शेवगाव), राजेंद्र नानासाहेब काकडे (वय – २७, रा. बेलगाव, ता. शेवगाव) ही अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांचा साथीदार नामे श्याम उर्फ अक्षय गवळी (रा. दहिगाव , ता. शेवगाव) हा फरार आहे.

या तिघांनी पुणे,औरंगाबाद , अहमदनगर अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात लग्नकार्य समारंभाचे बाहेरुन तसेच कंपन्यांच्या बाहेरुन बुलेट, पल्सर, शाईन, स्प्लेंडर अश्या प्रकारच्या गाड्या मोठ्या प्रमाणात चोरी करुन कागदपत्रे नंतर देण्याच्या बोलीवर सदरच्या गाड्या शेवगाव तालुक्यात खेडेगावांत किरकोळ रकमेत विकल्याचे सांगितले.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!