दुष्काळी परिस्थिती विखे पाटलांनी शेतकरांचे ७0 कोटी रूपये थकविले अशोक विखे यांनी घेतली अण्णा हजारेंची भेट

पारनेर | नगर सह्याद्री
डॉ. विठठलराव विखे सहकारी साखर कारखान्याने दुष्काळी स्थिती असतानाही शेतक-यांचे एफ आर पी प्रमाणे सुमारे ७0 कोटी रूपये थकविले असल्याचा आरोप राधाकृष्ण विखे यांचे बंधू प्रवरा एज्युकेशन सोसायटीचे कार्यकारी अध्यक्ष अशोक विखे यांनी केला .
येत्या २० मे पासून राधाकृष्ण विखे यांच्या अधिपत्याखालील विविध संस्थांमधून शेतक-यांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात लोणी येथे उपोषणास प्रारंभ करणार आहेत.  राळेगणसिद्धीत त्यांनी ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची शुक्रवारी सुमारे अर्धा तास भेट घेउन चर्चा केली .
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी राधाकृष्ण विखे यांच्यावर सडकून टिका केली . पत्रकारांशी बोलताना विखे म्हणाले , उस उत्पादकाने कारखान्याला उस घातल्यानंतर १४ दिवसांत एफ आर पी ची रक्कम शेतक – यांच्या खात्यावर वर्ग होणे हे कायदेशिरित्या बंधनकारक आहे . मात्र त्याबाबत कारखान्याची मनमाणी सुरू आहे .
अशाच पद्धतीने सोसायटी कर्जाची रक्कम उस बिलातून कपात करूनही ती रक्कम संबंधित शेतक याच्या सोसायटी कर्ज खात्यावर वर्ग केली जात नाही . परिणामी शेतक – यांच्या कर्जाचे व्याज वाढते , तो थकबाकीदार दिसतो.

थकबाकीदार असल्यामुळे सोसायटी ना हरकत प्रमाणपत्र देत नाही . त्यामुळे शेतक – यांना राष्ट्रीयकृत बँकांचे कर्जही मिळत नाही . अशा पद्धतीने राहाता , श्रीरामपूर , राहुरी तालुक्यातील शेतकरी अडचणीत आलेले आहेत.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!