दुचाकी चोरीचे सत्र सुरूच

अहमदनगर : शहरात दुचाकी चो-यांचे सत्र सुरूच असून, दररोज चोरीच्या घटना घडत आहेत.  मंगळवारी (दि . १४ ) दुचाकी चोरीचे शहर व परिसरात तीन गुन्हे दाखल झाले आहेत. दुचाकी चोरट्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून जोर धरीत आहे. सावेडीतील पवननगर येथून गणेश परशुराम पवार यांची दुचाकी चोरीस गेली. तसेच पाईपलाईन रोड येथील दत्तनगर येथून ऋषिकेश महादेव घोडके यांची दुचाकी राहत्या घरून लंपास झाली.

You might also like

Leave a Reply

error: Content is protected !!